कॅन्सर हा आजार कोणत्याही प्रकारचा आणि कुठल्याही स्वरूपात असला तरी रुग्ण मानसिक व शारीरिक दृष्टीने खचलेला असतो व त्यामुळे सहाजिकच स्वभाव सुध्दा चिडचिडा होतो. अशावेळी खरी गरज असते ती त्याला समजुन घेण्याची व धीर देण्याचे. दुर्दैवानं आज सगळीकडे भावनाशून्य व्यावसायीक तत्वावर बहुतेक तज बाबरताना दिसतायेत पण आम्हांला मात्र खुप वेगळा अनुभव आला. कोरोनिगस्त परीस्थिती मुळे धूत हॉस्पीटल येथे केमोथेरपी उपचार मधेच थांबवा लागले.उर्वरित केमोथेरपी “निरामय रूग्णालय “चे डॉ. तुषार जी मुळे कॅन्सर तज्ञ यांच्या कडे घेण्याचे ठरले. मनात धाकधूक होतीच पण जेव्हा मी केमोथेरपी उपचारासाठी ” हॉस्पीटल मधे दाखल झालो आणि डॉ तसेच तेथील बैद्यकीय कर्मचारी यांच्या निगराणीत एक केमो घेतला आणि माझी सर्व भितीच नष्ट झाली. डॉ तसेच वैद्यकीय कर्मचारी चंद्रकांत काकडे यांनी अंत्यत आत्मियतेने माझी काळजी घेतली त्यामुळे मी खरंच भारावून गेलो. आज माझे ठरविलेले सर्व केमोथेरपी उपचार संपले होते. हॉस्पीटल मधुन बाहेर पडतांना मन भरुन आले.डोळे पाणावले होते! वाटले या डॉ रूपी देवाच्या चरणी नतमस्तक व्हावे. खरंच डॉ. हा देवाचे अवतार असतो हे मी खात्रीने सांगू शकतो. कोणत्याही डॉ आपल्या रुग्णाला आजारातून मुक्त होण्यासाठी धडपडत असतो. आणि आपल्यापैकी काही संयम सोडून अशा देवदूतांच्या अंगावर धावून जातात.खुप चुकीचे आहे खरंच असे वागू नये .चंद्रकांत तु पण खुप छान काम करतोयस! याचं क्षेत्रात व श्री तुषार मुळे सरानं सोबतच आपले भविष्य सुधारावा. डॉ. साहेब पुन्हा एकदा येऊन भेटेन तुम्हाला! एक रूग्ण म्हणुन नाही पण एक नातं जे निर्माण झाले….तुमच्या स्वभावामुळे…मी नक्की येऊन भेटणार सर !! धन्यवाद, राजपूत केशरसिंग कुदळे.म्हाडा कालनी गृहनिर्माण भवन जवळ. औरंगाबाद.